• सतीश पाटील यांनी मांडली सकल मराठा समाजाची भूमिका

येळ्ळूर / वार्ताहर

कर्नाटक सरकारतर्फे २२ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत राज्यात जातीय शैक्षणिक सामाजिक जनगणना सुरू झाली आहे. या कामाची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांकडे देण्यात आली आहे.

बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावातही गणनेला सुरुवात झाली असून माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी गणतीसाठी नियुक्त शिक्षकांना सकल मराठा समाजाची भूमिका समजावून सांगितली. येत्या काही दिवसांत संपूर्ण येळ्ळूर गावाची जनगणना पूर्ण होणार आहे.

संपूर्ण तालुक्यातील सर्व गावांमध्ये प्राथमिक शिक्षकच गणनेचे काम पाहत असून गावकऱ्यांशी नियमित संपर्कामुळे समन्वय साधणे अधिक सुलभ झाले आहे.