बेळगाव / प्रतिनिधी

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कपिलेश्वर परिसरात माजी पुजाऱ्याच्या मुलाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कपिलेश्वर मंदिराचे माजी पुजारी रामा पुजारी यांचा मुलगा सिद्धार्थ रामा पुजारी (वय २५) याने सुसाईड नोट लिहून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

या सुसाईड नोटमध्ये, माझी नको त्या निकृष्ट नावाने बदनामी केली जात आहे. माझ्यावर युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप केल्याने मला बाहेर पडणे कठीण बनले होते. या नाराजीतून आपण आत्महत्या करीत असल्याचे त्याने लिहून ठेवले आहे.

घटनेची माहिती मिळताच एसीपी शेखरप्पा आणि सीपीआय गाबी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.