• सीमाभागातील कन्नडसक्ती तात्काळ थांबविण्याची मागणी

बेळगाव / प्रतिनिधी

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना कन्नड सक्ती थांबविण्यासाठी तातडीने पावले उचलली जावी यासाठी निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष शुभम शेळके यांनी गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषिकांच्यावर होत असलेल्या कन्नड सक्तीचा पाढाच वाचला. यामध्ये कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीत काढलेल्या फतव्यापासून गणेश उत्सवाच्या काढलेल्या फलका पर्यंतच्या घटनांनची सविस्तर माहिती दिली आणि या सगळ्या प्रकारांमध्ये भाषिक अल्पसंख्यांकाच्या अधिकाराची तसेच संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकारांची कशी पायमल्ली होत आहे हे सांगितले.

यावर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर बोलताना म्हणाल्या कायद्याच्या चौकटीत राहून यावर काय पावलं उचलता येतील ती आम्ही नक्कीच उचलू आणि संविधानाची पायमल्ली कोठेही होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असे आश्वासन युवा समिती सिमाभागच्या शिष्टमंडळाला दिले.

यावेळी प्राध्यापक डॉ. अच्युत माने, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, खजिनदार व नगरसेवक शिवाजी मंडोळकर, युवा समिती निपाणीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, समिती नेते शिवाजी हावळाण्णाचे, महादेव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन गोरले, समिती नेते पिराजी मुंचडीकर, अशोक घगवे, चंद्रकांत पाटील, नारायण मुंचडीकर, विजय जाधव, रमेश माळवी,अभिजित मजुकर, सागर कणबरकर, अश्वजित चौधरी, सुनिल किरळे, अमर विठे, तात्यासाहेब कांबळे, राजकुमार मेस्त्री, सतीश पाटील, किरण मोदगेकर, सुरज जाधव, अभिजित कारेकर, अशोक डोळेकर,किसन सुंठकर यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.