येळ्ळूर : येथील मराठी मॉडेल शाळेत गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमास येळ्ळूर गावातील हिंदवी स्वराज्य युवा संघटनेचे कार्यकर्ते, एसडीएमसी अध्यक्षा-उपाध्यक्ष तसेच सदस्य-सदस्या उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. दिव्या संदीप कुंडेकर होत्या. प्रारंभी मान्यवरांचे पांढरी टोपी व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यानंतर शिवरायांच्या मूर्तीचे पूजन संघटनेचे कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, उपखजिनदार व सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले. ध्येयमंत्र, शिवरायांची आरती आणि प्रेरणामंत्र म्हणत शिवगर्जना करण्यात आली.
शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिवचरित्रावर प्रभावी भाषणे सादर केली तसेच शौर्यगीते गाऊन वातावरण देशभक्तीने भारावून टाकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सहशिक्षक श्री. सातेरी पाखरे यांनी केले. या प्रसंगी एसडीएमसी सदस्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








