नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवार, दि. १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. १९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात १४ विधेयके पटलावर येणार असून यात जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अधिवेशनाच्या एक दिवस आधी रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी मतदार यादीच्या विशेष पडताळणी, प्रदूषण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह अनेक विषयांवर चर्चेची मागणी लावून धरली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवण्याचे आवाहन केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासह विरोधी पक्षातील नेते बैठकीला उपस्थित होते.








