बेळगाव / प्रतिनिधी
वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या युवा डॉक्टरांनी आपल्याला लाभलेला व्हाईट कोट ही एक जबाबदारी आहे. याची जाणीव ठेवून सामाजिक सेवेचे कार्य करावे असे मार्गदर्शन डॉ. अमित भाटे यांनी केले.आधार शिक्षण संस्था संचालित श्री शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्हाईट कोट सेरेमनी मध्ये त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्राचार्य डॉ. डी. टी. बामणे होते. संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. पूजा बामणे, उपप्रचार्य डॉ.एम. एम साणिकोप, यावर्षीच्या प्रथम विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक डॉ. सुनील चौगुले उपस्थित होते.
सुरुवातीला सॅम्युएल हॅनेमन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बीएचएमएस अभ्यासक्रमातील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना डॉक्टरांसाठीच्या व्हाईट कोटचे वितरण करण्यात आले. डॉ. अस्मिता पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. सविता मठद यांनी वैद्यकीय सेवेची शपथ देवविली. डॉ.सबिहा रंगरेज यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत भोसले यांनी केले. कार्यक्रम संयोजनासाठी संस्थेमधील डॉक्टर, प्राध्यापक वर्गासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.








