• नामवंत साहित्यिकांची लाभणार उपस्थिती

उचगाव / वार्ताहर

उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित 25 वे उचगाव मराठी साहित्य संमेलन येत्या रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी अनेक नामवंत आणि दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीत होणार असून, या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उचगाव नगरीत ख्यातनाम साहित्यिक, कवी ,विचारवंत यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचा हा सोहळा दिमाख्यात पार पाडण्यासाठी आता उचगाववासिय सज्ज झाले आहेत.

25 वे हे साहित्य संमेलन चार सत्रामध्ये होणार असून संमेलनाचे अध्यक्ष म्हणून माऊली जिल्हा सांगली येथील इंद्रजीत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार असून पहिल्या सत्रात त्यांचे अध्यक्ष भाषण होणार आहे. इंद्रजीत देशमुख संस्थापक ,शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान ,घारेवाडी. माजी प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्र राज्य अध्यात्मिक साधक, संत साहित्याचे अभ्यासक, वारकरी संप्रदायाचे आचरण करते आहेत.

दुसऱ्या सत्रात पुणे येथील डॉ. संजय उपाध्ये, हे एक हास्य दंगल विनोदी कार्यक्रम यावर ते आपल्या विनोदी शैलीमध्ये आपले विचार मांडणार आहेत. सालाबाद प्रमाणे यावर्षीही दुपारी उचगावच्या मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणातील ,गांधी चौकात सर्वांना गोड भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

यानंतर तिसऱ्या सत्रात कथाकथन होनार आहे. उचगाव साहित्य संमेलनाचे विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण दरवर्षी विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून यावर्षी जयवंत आनंदा आवटे कुंडल ता. पलूस जिल्हा सांगली यांना निमंत्रण देण्यात आले आहे.ते प्रेक्षकांना खळखळून हसण्यास लावणारे हास्य कथाकथन कार्यक्रम सादर करणार आहेत.

तर चौथ्या सत्रामध्ये उचगावच्या साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य साहित्य संमेलनाची सांगता ही हशांने केली जाते .यासाठी गेली 24 संमेलन हे चौथे सत्र विनोदी आणि हास्य असेच ठेवण्यात आले आहे. यावर्षीही या सत्रात विनोदी असे झी मराठी हास्य सम्राट फेम प्राध्यापक अजितकुमार कोष्टी, मुंबई हे उपस्थित राहणार असून या चौथ्या सत्रात त्यांचा हा विनोदी हशा ने भरलेल्या या कार्यक्रमाचा आनंद साहित्य प्रेमींना यावर्षी मिळणार आहे.

तरी या चार सत्रामध्ये होणाऱ्या या साहित्य पूर्ण अशा संमेलनाला बेळगाव,खानापूर ,चंदगड, निपाणी या सर्व तालुक्यातील साहित्य प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहून या दिग्गज अशा साहित्यिक ,कवींच्या विचारांचा लाभ घ्यावा असे उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या वतीने अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर,सेक्रेटरी एन.ओ. चौगुले, कार्याध्यक्ष बाळासाहेब देसाई यांनी कळविले आहे.