• अपघाताचा धोका वाढला

बेळगाव : शहरातील तिसऱ्या रेल्वे ओव्हरब्रिजवर लावण्यात आलेले बॅरिगेट्स अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे वाहतूक करणाऱ्यांसमोर मोठा अपघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

ओव्हरब्रिजवर पडलेली बॅरिगेट्स रस्त्याच्या मध्यभागी अडथळा निर्माण करत असल्यामुळे वाहनांची गती मंदावली आहे आणि वाहतुकीवर थेट परिणाम झाला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक आहे, तसेच रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी करत, संबंधित विभाग आणि रहदारी पोलिसांना घटनास्थळी त्वरित दाखल होऊन बॅरिगेट्स हटवण्याचे आवाहन केले आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.