बेळगाव / प्रतिनिधी
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत बेळगाव महानगरपालिकेने मालमत्ता करातून 63.05 कोटी रुपयांची वसुली केली आहे. 89.48 कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत 70.45 टक्के वसुली पूर्ण झाल्याने महापालिकेची कामगिरी समाधानकारक ठरत आहे.
आता उर्वरित तीन महिन्यांत सुमारे 26.44 कोटी रुपयांचा कर वसूल करण्याचे आव्हान महापालिकेसमोर असून, उद्दिष्टपूर्तीसाठी कर वसुली मोहिमेला अधिक गती देण्यात येत आहे.
मागील आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी एकूण 69.52 कोटी रुपयांची वसुली झाली होती. यंदा आतापर्यंत झालेल्या वसुलीचा वेग पाहता, चालू वर्षात नवीन विक्रम नोंदवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








