- टायर फुटल्याने उलटली कार
बेळगाव / प्रतिनिधी
मुत्नाळ (ता. बेळगाव) नजीक राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव कारचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला. मंगळवार दि. २२ रोजी ही घटना घडली. यात कारमधील सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाता दरम्यान सदर कार बेळगावहून हुबळीकडे निघाली होती. यावेळी मुत्नाळ गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना अचानक तिचा टायर फुटला.त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. या अपघातात कारमधील सहाही प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.
जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे.