बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावच्या भव्य सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा पुढे नेण्याचे काम एका विशिष्टपूर्ण रीतीने बेळगाव उपनगरातील बॅरिस्टर नाथ पै चौक शहापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केले आहे. यावर्षी बॅरिस्टर नाथ पै चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. त्याचबरोबर याच भागातील सुप्रसिद्ध संगीता स्वीट्स ५१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाच्यावतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत समाजात घडणाऱ्या घडामोडींचे वास्तववादी चित्र जनतेसमोर मांडणाऱ्या पत्रकारांच्या कार्यासंदर्भात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंडळाच्या वतीने पत्रकारांचा शुक्रवारी सायंकाळी सन्मान करण्यात आला.

यावर्षी बॅरिस्टर नाथ पै चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम यावर्षी हाती घेतले आहेत. सुवर्ण महोत्सवी वर्षात मंडळाने यावर्षी सादर केलेला काशी विश्वनाथाचा भव्य देखावा गणेश भक्तांसाठी आकर्षण ठरला आहे.

सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या वतीने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय आणि मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी रक्तदान शिबिर संपन्न झाले. सामाजिक कार्यकर्त्या सुषमा पाटील यांच्या सहयोगाने गुरुवारी वृद्धांना ब्लँकेट, शुक्रवारी सकाळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी बेळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार कृष्णा शहापूरकर, विलास अध्यापक, विलास जोशी, संयुक्त कर्नाटकच्या कीर्तीताई, मल्लिकार्जुन मुगळी, ज्ञानेश्वर पाटील, सुबानी मुल्ला, उपेंद्र बाजीगर, प्रकाश बिळगोजी, रवींद्र जाधव, अमृत बिर्जे, सुहास हुद्दार, चेतन कारेकर, रोहन पाटील, मिलिंद देसाई, गिरीश कल्लेद, उमेश गंगाधर, श्रीकांत काकतीकर आदींचा शाल, पुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कृष्णा शहापूरकर आणि कीर्ती ताई यांनी यावेळी मंडळाच्यावतीने हाती घेण्यात आलेले सामाजिक उपक्रम तसेच मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील आणि संगीता स्वीट च्या पाटील कुंटुंबियांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने केलेल्या कार्याबद्दल कौतुक व्यक्त केले. पत्रकारांच्या सन्मानासंदर्भात मंडळाचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित पत्रकारांच्याहस्ते श्री गणेशाची पूजा आणि आरती करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, उपाध्यक्ष सचिन रंगरेज, कार्याध्यक्ष प्रदीप मजुकर, परशराम घाडी नागेश शिंदे, सदानंद अरुंदेकर, शंकर चव्हाण, लक्ष्मण छत्र्याण्णावर, सदानंद कडगावकर, अण्णाप्पा मुगळीकर, सदानंद कदम, हिरालाल चव्हाण, यल्लापा बसरीकट्टी, संजय गठ्ठे, सुनील पुजारी, श्रीकांत काकतीकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते सदस्य उपस्थित होते.