- बसच्या चाकाखाली सापडून ३ वर्षीय बालिका गंभीर जखमी
सौंदत्ती : गुरुवारी सौंदत्ती बस स्थानकावर एक दुर्घटना घडली, ज्यात आई-वडिलांसोबत बसमध्ये चढताना पाय घसरल्याने एक चिमुकली मुलगी बसच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाली. धन्या हिरेमठ (वय 3 वर्षे रा.चोलाचागुड्डा ता.बदामी) असे त्या मुलीचे नाव आहे. या दुर्घटनेत तिचा हात तुटला असून पायाला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची नोंद सौंदत्ती पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.







