बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी मराठी विद्यानिकेतन येथे असलेल्या सीमोल्लंघन मैदानाची पाहणी करून आगामी २ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या विजयादशमी उत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी या वेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना शिस्तबद्ध नियोजन करण्याचे निर्देश दिले.
या पाहणीवेळी दसरा महामंडळाचे मानद अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, तसेच मल्लेश चौगुले, अंकुश केसरकर, बळवंत शिंदोळकर, किरण, विविध देवस्थानचे पदाधिकारी लक्ष्मण किल्लेकर, श्रीनाथ पवार, मुर्गेश अंगडी, उमेश कंबरकर, मनोज काकतकर आदी मान्यवर उपस्थित होते.