- मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पूर्णविराम
हुक्केरी : राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पूर्णविराम देत मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच आपला पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील, असे स्पष्ट विधान केले आहे.
हुक्केरी येथे बोलताना सतीश जारकीहोळी यांनी राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडली. भाजप नेते रमेश कत्ती यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “हायकमांडच्या निर्णयानुसार सिद्धरामय्या हेच पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री राहतील, यात कोणतीही शंका नाही.”
राज्यात सुरू असलेल्या नेतृत्व बदलाच्या चर्चा निराधार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारचे संपूर्ण लक्ष विकासकामांवर आणि लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर केंद्रित असल्याचे ते म्हणाले.
विरोधक राजकीय हेतूने अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत, मात्र सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.








