बेळगाव / प्रतिनिधी
आधार एज्युकेशन सोसायटीच्या श्री शिव बसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, बेळगाव यांच्या शाश्वत या वार्षिक क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सुप्रसिद्ध राष्ट्रीय कुस्तीपटू कामेश पाटील यांनी केले. स्वागत भाषण के. सानिका यांनी केले.डॉ. संदीप पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. विनोद व्हनाळकर यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ दिले.
मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे कामेश पाटील यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलित केली. शपथविधी आर. गायत्री यांनी केला. प्राचार्य डॉ. डी. टी. बामणे यांनी अध्यक्षीय भाषण केले आणि क्रीडास्पर्धेची सुरुवात घोषित केली. आभार प्रदर्शन डी. इकराना यांनी केले. एम. फसीहा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








