बेळगाव / प्रतिनिधी
मारुती मंदिरात असणाऱ्या अध्यापक बंधुच्या प्राचीन शीव, श्री नरसिंह आणि वराह मंदिरात रविवारी श्री नरसिंह जयंती भक्तीभावाने साजरी करण्यात आली. श्री नरसिंह जयंती निमित्त मंदिरात सकाळी महाअभिषेक करण्यात आला. नंतर श्री नरसिंह कवच पठण ब्रह्मवृंदानी केले. महानैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली. यावेळी देशाच्या सैनिकांच्यासाठी आणि ऑपरेशन सिंधुर साठी विशेष प्रार्थना करण्यात आली. पूजेचे पौरोहित्य वेद शास्त्र संपन्न नागेश देशपांडे यांनी केले. यावेळी मंदिराचे विश्वस्त विलास अध्यापक, प्रकाश अध्यापक, आनंद अध्यापक, संजीव अध्यापक, निरंजन अध्यापक आणि भक्त मंडळी उपस्थित होती. दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.