बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव येथील श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिराच्यावतीने साजऱ्या केल्या जाणाऱ्या श्री महाशिवरात्री महोत्सवाच्या पूर्वतयारीची आज पोलीस अधिकारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे बेळगाव येथील श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिराच्यावतीने यंदाच्या श्री महाशिवरात्री महोत्सवाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. शिवभक्तांना गैरसोय होऊ नये म्हणून केल्या जाणाऱ्या या पूर्व तयारीचा आज पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा करून आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात खडेबाजार पोलीस स्टेशनचे मुख्य अधिकारी पोलीस निरीक्षक महांतेश द्यामणावर आणि एक्स्ट्रीम सिक्युरिटीचे रघुनाथ देसाई यांच्या समवेत महापालिकेचे आनंद पिंपळे, श्री कपिलेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष राहुल कुरणे, अभिजीत चव्हाण, विवेक पाटील, प्रथमेश कावळे, ज्योतिबा कावळे, संतोष देवर आदींचा सहभाग होता.








