बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव येथील पांगूळ गल्लीतील श्री अश्वत्थामा युवक मंडळाच्या वतीने यंदा होळी सणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. २ मार्च २०२६ रोजी रात्री १० वाजता होळी आणण्याचा व पळवण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. मंडळाच्या वतीने या उत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
मंगळवार, दि. ३ मार्च २०२६ रोजी पहाटे ५.३० वाजता होळी आणि होळी धनाची पूजा केली जाणार आहे. यंदा चंद्रग्रहण असल्यामुळे अन्य कार्यक्रमांच्या वेळेत बदल करण्यात आला असून, सायंकाळी ५ वाजता गणपती मंदिरापासून लोटांगण कार्यक्रमाला सुरुवात होईल. ग्रहण सुटल्यानंतर देवालयाची मुख्य पूजा करून श्रीफळ वाढवण्यात येतील, असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. या बदलांची सर्व भाविकांनी आणि बेळगावमधील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पांगूळ गल्लीतील पंच कमिटी व कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी केले आहे.








