बेळगाव : मूळचे चव्हाट गल्ली व सध्या शिवगिरी कॉलनी विजयनगर येथील रहिवासी अनंत केदारी जाधव (वय ८१) यांचे आज सोमवार दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे १ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, सहा भाऊ, एक बहीण, एक विवाहित मुलगा, एक मुलगी, जावई असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज दुपारी १ वाजता चव्हाट गल्ली स्मशानभूमी येथे होणार आहे. ते दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे संचालक, विद्यानिकेतन संस्थेचे सचिव व जालगार मारुती ट्रस्ट चव्हाट गल्ली आणि श्री ज्योतिर्लिंग देवस्थान शिवबसवनगरचे संचालक होते.