बेळगाव / प्रतिनिधी

आधार शिक्षण संस्था संचालित श्री शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्या वतीने स्वच्छता आणि आरोग्य जागृती विषयक उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून नागरिकांना कचरा निर्मूलन योग्य रीतीने करावे तसेच कचरा साचून राहणार नाही याची दक्षता घेण्याचे महत्त्व सांगण्यात आले.

याकरिता विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन मार्गदर्शन केले. आश्रय कॉलनी, सारथीनगर, सह्याद्रीनगर परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कचरा साचून राहिल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.यामधून आजार उद्भवतात. अशावेळी नागरिकांनी प्रारंभापासून कचऱ्याच्या संकटापासून मुक्त रहावे असे मार्गदर्शन करण्यात आले. या जागृती मोहिमेमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फलक हाती घेऊन जागृती केली. हॉस्पिटल मधील ऑर्गेनॉन आणि कम्युनिटी मेडिसिन विभागाने संयुक्तरीत्या हा उपक्रम राबविला. याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे संयोजन आधार शिक्षण संस्थेचे चेअरमन प्राचार्य डॉ. डी. टी. बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. उपक्रमाचे संयोजन डॉ.सेबेस्टियन डिसोजा यांच्यासह डॉ. झाकीर हुसेन मुजावर, डॉ. सबिहा रंगरेज डॉ. मनीषा यांनी केले होते.