बेळगाव / प्रतिनिधी

शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (सीमाभाग) पक्षातर्फे सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा क्र. ५ वडगांव येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम गुरुवार दि. १९ रोजी 2025 रोजी दु. १२ वाजता पार पडला. यावेळी १ ली ते ७ वी पर्यंतच्या १६० विद्यार्थी – विद्यार्थीनींना वह्या, कंपास, पेन्सील बॉक्स व मिठाई वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांनी शिवसेनेबद्दल मराठी प्रेम किती आहे आणि पक्षाची शिस्त काय आहे याबद्दल माहिती दिली. यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख अरविंद नागनुरी, उपशहरप्रमुख राजू तुडयेकर, उपशहरप्रमुख प्रविण तेजम, युवा सेनेचे विनायक हुलजी, चेतन गंगाधर, प्रदीप सुतार, अमर कडगांवकर, आनंद गोंधळी, प्रतिक देसुरकर, सक्षम कंग्राळकर, अवधुत कंग्राळकर, मल्हारी पावशे, प्रकाश हेब्बाजी, मयुरेश काकतकर उपस्थित होते.

शाळेचे शिक्षक नितीन बेनके यांनी स्वागत केले. यावेळी शिक्षिका विजय रसाळ, दिपा देसुरकर, के. व्ही. कुंटे, माधुरी पाटील, आशा शिक्षक वृंद उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन वैशाली पाटील केले.