बेळगाव / प्रतिनिधी

बेनकनहळ्ळी येथील शिवराज हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. परशराम आर. पाटील हे आपल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. यानिमित्ताने शनिवार दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ठीक १०.३० वा. हायस्कूलच्या सभा मंडपात सेवानिवृत्ती सदिच्छा सोहळा होणार आहे.

या कार्यक्रम प्रसंगी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, शाळा सुधारणा कमिटी, बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत व पंच कमिटी, विविध सहकारी संस्था, युवक मंडळे, मराठी व कन्नड प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा सुधारणा कमिटी, प्राथमिक व हायस्कूलची माजी विद्यार्थी संघटना, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारी आजी-माजी विद्यार्थी – विद्यार्थिनी, मित्र मंडळ परिवार बेनकनहळ्ळी ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.