बेळगाव / प्रतिनिधी

आधार एज्युकेशन सोसायटी संचालित शिवबसवज्योती होमिओपॅथिक कॉलेजमध्ये नूतन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला.यावेळी पाहुणे म्हणून आधार सोसायटीचे चेअरमन प्राचार्य डॉ. डी. टी. बामणे उपस्थित होते. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या व्हाईस चेअरमन डॉ. पूजा बामणे कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. एम. एम. साणिकोप यावर्षीच्या विद्यार्थ्यांचे समूह मार्गदर्शक डॉ. सुनील चौगुले उपस्थित होते. त्यानंतर उपस्थित विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत डॉ. समरीन कावरे यांनी केले. शिवानी हिने प्रार्थना सादर केली. होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. डॉ. सीमा भजंत्री यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. नूतन गुणदाळ संस्थेबद्दलचा माहितीपट सादर केला. डॉ. प्रशांत भोसले यांनी होमिओपॅथी अभ्यासक्रमाबद्दल सविस्तर विवेचन केले .प्रतिबंधक उपप्रचार्य डॉ. एम. एम. साणिकोप यांनी रॅगिंग प्रतिबंधक नियमांची माहिती दिली.  डॉ. सविता मठद यांनी विद्यार्थ्यांना शपथ देवविली. डॉ. सुनील चौगुले यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. प्राचार्य डॉ. डी. टी. बामणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना किट चे वितरण करण्यात आले. जिमखाना कमिटीचे सदस्य गुरुनाथ आणि गायत्री यांनी कार्यक्रमाला उपस्थित पालकांचे स्वागत पुष्प देऊन केले. डॉ. अस्मिता पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सबीहा यांनी केले.