बेळगाव / प्रतिनिधी

आधार एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या वार्षिक उत्सवानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता वार्षिक पदवीदान समारंभ होणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. प्रभू हळकट्टी हे उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे विशेष अतिथी म्हणून आयएमए चे अध्यक्ष डॉ. हेमंत कौजलगी उपस्थित राहणार आहेत. शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. डी. टी. बामणे आणि व्हाईस चेअरमन पूजा बामणे हे देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच दिनांक पाच रोजी संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन साजरे होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. जे. टी.देवेगौडा उपस्थित राहणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.