बेळगाव / प्रतिनिधी
आधार एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा पदवीदान कॉलेजचा समारंभ उत्साहात पार पडला. कॉलेजच्या वार्षिक उत्सवानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गुरुवार दि. ४ डिसेंबर रोजी पदवीदान समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. प्रभू हळकट्टी हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.
विशेष अतिथी म्हणून आयएमएचे अध्यक्ष डॉ. हेमंत कौजलगी उपस्थित होते. शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. डी. टी. बामणे यांनी विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवेबाबत मार्गदर्शन केले. व्हाईस चेअरमन पूजा बामणे व्यासपीठावर उपस्थित होत्या. प्रारंभी विद्यार्थ्यांनी शानदार संचलन करून उपस्थितांची मने जिंकली. व्यासपीठावरील कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रार्थना सादर केली. त्यानंतर डॉ. समरीन कावरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रारंभी होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्याहस्ते पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडताना कॉलेजच्या व्यवस्थापनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रुती मनगंटीकर आणि डॉ. सविता मठद यांनी केले. डॉ. विनायक भोसले यांनी आभार मानले. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. नूतन गुणदाळ यांच्या संयोजनाखाली सर्व कार्यक्रम पार पडले.








