- सौंदत्ती तालुक्यातील घटना
सौंदत्ती / वार्ताहर
बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती तालुक्यातील मालगली गावात आज रविवारी एका पिता – पुत्राचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. बसवराज केंगेरी (वय ४०) आणि धारप्पा केंगेरी (वय १४) दोघेही (रा. मुरगोडा ता.सौंदत्ती) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार बसवराज हे पत्नीचे मूळ गाव असलेल्या मलागली गावात त्यांच्या शेतातील पिकांवर कीटकनाशके फवारण्यासाठी शेतातील तळ्यातून पाणी भरत होते.
यावेळी बसवराज प्रथम तलावात पडला. हे पाहून वडिलांच्या बचावासाठी धावलेले दोन्ही मुलगे, धारप्पा आणि बागप्पा पाण्यात पडले. यावेळी धारप्पा याचाही मृत्यू झाला. परंतु शेजारच्या शेतातील लोकांनी बागप्पाला वाचवले.
मात्र बागप्पाची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर बैलहोंगल सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान मुरगोड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी मुरगोड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.