बेळगाव / प्रतिनिधी
चिकोडी तालुक्यातील नागरमुन्नोळी नजीक कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष चुन्नप्पा पुजारी यांच्या वाहनाचा अपघात झाला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
चुन्नप्पा पुजारी यांची कार हंचिनाळकडून नागरमुन्नोळीमार्गे कब्बूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या कारमधील कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही, अशी माहिती चुन्नप्पा पुजारी यांनी स्वतः दिली आहे. बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे ११ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी भव्य आंदोलनाचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी शेतकरी नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी ते प्रवास करत असताना हा अपघात घडला, असे समजते.








