बेळगाव : दिल्ली येथे पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेत बेळगावच्या उदयोन्मुख हॉकीपटू मुला-मुलींच्या संघाने सुवर्णपदक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. या कामगिरीबद्दल शहर महाराष्ट्र एकीकरण समिती, श्रीराम सेना हिंदुस्थान, मराठा समाज तसेच समस्त मराठी भाषिकांच्या वतीने खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

सत्कार सोहळ्यात शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील तसेच श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत दादा कोंडुसकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. बेळगावमध्ये अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदान उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मराठा समाजाचे समन्वयक संजय सातेरी, माजी उपमहापौर संजय शिंदे, वडगावचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रमुख अमोल देसाई, बेळगाव बॉडी बिल्डिंग स्पोर्ट्स अँड फेडरेशनचे कार्याध्यक्ष अनिल अमरोळे, कार्यकर्ते श्रीधर खंनुकर, सागर पाटील, मनोहर सांबरेकर, सुनील बोकडे, भरत नागरोळी, हॉकी बेळगावचे उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर, मनोहर पाटील तसेच प्रशिक्षक उत्तम शिंदे, सुधाकर चाळके, देशनूर सर आदींसह असंख्य क्रीडापटू व पालक लेले मैदान येथे उपस्थित होते.