बेळगाव / प्रतिनिधी

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक रविवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी रंगुबाई भोसले पॅलेस रामलिंग खिंड बेळगाव गल्ली बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे.

समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांनी केले आहे. बैठकीत एक नोव्हेंबर काळा दिन आणि सायकल फेरी या संदर्भात चर्चा होणार आहे.