बेळगाव / प्रतिनिधी
शहापूर नाथ पै चौकातील वाल्मिकी समाजाच्या आद्य कवी वाल्मिकी देवस्थान ट्रस्टच्या वाल्मिकी राम मंदिरात आज गुरुवारी रामनवमी उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली.
बेळगाव शहरातील एकमेव वाल्मिकी राम मंदिरात झालेल्या कार्यक्रमांत अभिषेक, महापूजा आणि आरती पार पडली. गोधोळी येथील बेटगेरी महाराज भजनी मंडळाच्या भजन कार्यक्रमाने सोहळ्याची शोभा वाढवली. प्रोत्साह फाउंडेशनचे सेक्रेटरी संतोष होनगल, मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेचे हिरालाल चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते संजय चौगुले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रामनवमीच्या निमित्ताने महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. दिवसभर चाललेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आद्य कवी वाल्मिकी देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी मारुती नाईक, व्यवस्थापक महादेव शहापूरकर, राजू नाईक, अशोक नाईक आणि संजय शहापूरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.








