बेळगाव / प्रतिनिधी

सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारचे माजी महाभियोक्ता आशुतोष कुंभकोणी यांची सीमाप्रश्नी कायदेशीर सल्ला देण्यासाठी आणि सीमाप्रश्नाची सोडवणूक लवकरात लवकर व्हावी यासाठी मदत करण्याकरिता महाराष्ट्र सरकारच्यावतीने नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महाराष्ट्र सरकारकडे साक्षीदारांच्या तयारीसाठी दाव्याची माहिती असलेले माजी महाभियोक्ता आशुतोष कुंभकोणी यांची वकिलांच्या बॅनरवर नियुक्ती करावी अशी मागणी होती. महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून कुंभकोणी यांची लवकर नेमणूक करावी अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने कुंभकोणी यांची सीमाप्रश्नी कायदेशीर सल्लागारपदी नियुक्तीचा निर्णय घेतला आहे.