बेळगाव / प्रतिनिधी
सार्वजनिक वाचनालयातर्फेदिले जाणारे पत्रकार पुरस्कार जाहीर झाले आहेत. महिलांना दिला जाणारा प्रा. एस. आर. जोग महिला पत्रकार पुरस्कार मराठी विभागासाठी पुढारी न्यूज टीव्हीच्या प्रतिनिधी अक्षता नाईक यांना जाहीर झाला आहे. महिलांमध्ये कन्नड विभागासाठी विमला चिनकेकर (दै. होसदिगंत, चिकोडी) यांची निवड करण्यात आली आहे. पुरुषांमध्ये मराठी विभागासाठी सुशांत कुरंगी (तरुण भारत) तर कन्नड विभागासाठी मंजुनाथ पाटील (पॉवर टीव्ही) यांची निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार वितरण रविवारी (दि. १८) सायंकाळी ५.३० वाजता मराठा मंदिरमध्ये आयोजित बॅ. नाथ पै व्याख्यानमालेच्या उद्घाटन सोहळ्यावेळी केले जाणार आहे.








