बेळगाव / प्रतिनिधी

अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या तीन अथलेटिक खेळाडूंची विद्याभारती राष्ट्रीय अथलेटिक स्पर्धेसाठी दक्षिण मध्य क्षेत्र संघात निवड झाली आहे. बंगळुर येथील जनसेवा विद्या केंद्र शाळेच्या मैदानावर विद्याभारती कर्नाटक व दक्षिण मध्य क्षेत्र आयोजित राज्यस्तरीय व क्षेत्रीय अथलेटिक स्पर्धेत बेळगांव जिल्हा विद्याभारती संघाचे प्रतिनिधीत्व करताना अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यमिक शाळेच्या दीपा बिडी, हिने प्रांतीय व क्षेत्रीय अथलेटिक स्पर्धेत ३ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक, तसेच ८०० मीटर धावण्याचे शर्यतीत कांस्यपदक पटकाविले, मनस्वी चतुरने उंच उडी प्रकारात २ सुवर्णपदक, तर भावना बेरडे हिने राज्यस्तरीय स्पर्धेत लांबउडी तिहेरीउडी रौप्यपदक तर १०० मीटरमध्ये कांस्यपदक पटकाविले तर क्षेत्रीय स्पर्धे लांबउडीत सुवर्ण व तिहेरी उडीत कांस्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

आता पुढील महिन्यात हासन येथे होणाऱ्या विद्याभारती राष्ट्रीय स्पर्धेसाठी दीपा, मनस्वी, भावना हे खेळाडू पात्र ठरले आहेत या खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, शिवकुमार सुतार, यश पाटील, अनुराधा पुरी यांचे मार्गदर्शन तर संस्थेचे अध्यक्ष व विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, विद्याभारती जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, सचिव रामनाथ नाईक, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, शिक्षक वर्ग व पालकांचे प्रोत्साहन लाभत होत आहे.