बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावचे प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टन्नावर यांची नुकतीच राज्य सरकारने सहकार खात्याच्या सचिवपदी बदली केली होती. मात्र, सदर बदली रद्द करण्यात आली असून तसा अधिकृत आदेश शुक्रवार दि. १८ रोजी जारी करण्यात आला आहे. बेळगावचे प्रादेशिक आयुक्त म्हणून संजीव शेट्टेन्नावर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. अलीकडेच खाऊ कट्टा प्रकरणी महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांना अपात्र ठरविल्याने ते राज्यभरात चर्चेत आले होते. त्यातच चार दिवसांपूर्वी त्यांची सहकार खात्याच्या सचिवपदी बदली करण्यात आल्याचा आदेश जारी करण्यात आला होता. पण सदर आदेश रद्द करून त्यांची पुन्हा बेळगाव प्रादेशिक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.