बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील सक्षम स्पोर्ट्स एरिना या क्रीडा संस्थेतर्फे आयोजित 14 वर्षाखालील बाद पद्धतीच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने पटकावले आहे.
सदर स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने प्रतिस्पर्धी ज्योती सेंट्रल हायस्कूलचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला विजेत्या सेंट झेवियर संघातर्फे अरकन बडेघर याने 2 गोल, तर कार्तिकेश जालगेर, आयुष सिद्दनावर व समर्थ भंडारी यांनी प्रत्येकी एक गोल केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने प्रतिस्पर्धी जैन हेरिटेज हायस्कूल संघावर 1-0 असा निसटता विजय संपादन केला. सेंट झेवियर्सतर्फे एकमेव विजयी गोल आयुष सिद्दनावर याने नोंदवला. स्पर्धेचा अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने प्रतिस्पर्धी संजय घोडावत हायस्कूल संघाला 3 -0 अशा गोल फरकाने पराजित करून विजेतेपद हस्तगत केले. सेंट झेवियर्सतर्फे आयुष सिद्दनावर समर्थ, भंडारी व अरकन बडेघर यांनी प्रत्येकी एक गोल केला. स्पर्धेनंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभात सेंट झेवियर्स हायस्कूल संघातील समर्थ भंडारी याला ‘उत्कृष्ट बचावपटू’ आणि उझेर रोटीवाले याला ‘उत्कृष्ट गोलरक्षक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.