• शेतकरी कुटुंबीयांनी जपली परंपरा

सुळगा (हिं.) / वार्ताहर

हिंदू धर्मियांच्या प्रमुख सणांपैकी एक असलेल्या दिवाळी सणाची सुरुवात वसुबारस सणाने होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात वसुबारसने दीपोत्सवाला प्रारंभ झाला आहे.

ग्रामीण भागात शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने वसुबारस साजरा करण्याची पारंपरिक पद्धत अजूनही जोपासली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी वसुबारस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने साईकॉलनी सुळगा (हिं.) येथील सासू – सून ग्रुपच्या महिलांनी गाईची विधिवत पूजा करून तिला नैवेद्य दिला.

यावेळी प्रगतीशील शेतकरी ह. भ. प. श्री. बाळू शंकर कलखांबकर यांच्यासह सासू – सून ग्रुपच्या महिला सौ. विमल गुरूनाथ कलखांबकर, सौ. रेणुका मल्लाप्पा कलखांबकर, सौ. रमा परशराम पाटील, सौ. स्मिता बाळासाहेब पाटील, सौ. लक्ष्मी भरमा पाटील, सौ. श्वेता परशराम कदम, सौ. वनिता मल्लाप्पा कदम, सौ. रेखा अजित कलखांबकर, सौ. लक्ष्मी शिवाजी कलखांबकर उपस्थित होत्या.