बेळगाव : कृतज्ञता व देशभक्तीची भावना जपण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बेलगाव दर्पण (RCBD) यांनी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर मधील शूर जवानांसोबत राखी पौर्णिमा (रक्षाबंधन) साजरी केली. कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या स्नेहपूर्ण उपस्थितीत झालेला हा कार्यक्रम सर्वांसाठी अभिमानास्पद व संस्मरणीय ठरला.

रोटरी दर्पणच्या अध्यक्ष रोटे. ॲड. विजयलक्ष्मी मन्निकेरी व क्लब सचिव रोटे. कवरी करूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सोहळ्यात राखी बांधण्याची परंपरा ही केवळ सणापुरती मर्यादित न राहता देशरक्षणासाठी असलेल्या जवानांच्या अथक सेवेचा सन्मान आहे.

“ही आमच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारी क्षणयात्रा होती, आपल्या मातृभूमीच्या रक्षकांबद्दल प्रत्यक्ष कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली,” असे सदस्यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी इव्हेंट चेअर रोटे. सविता वेसणे यांचे विशेष योगदान होते. तसेच सेवानिवृत्त सुबेदार मेजर सुधाकर चाळके यांचेही विशेष आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाला रोटरी सदस्य रोटे. सुरेखा मुम्मिगट्टी, डॉ. स्पूर्ती मस्तीहोळी, शीला पाटील, कोमल कोळ्लीमठ, सविता हेब्बार, यशस्वी व रोटरॅक्ट सदस्य प्रीती मन्निकेरी उपस्थित होते.