बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्हा युवजन सेवा आणि क्रीडा खात्याची एनआयएस ज्युडो प्रशिक्षिका रोहिणी पाटील हिची भारतीय महिला जुडो संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. दिनांक १० ते १५ सप्टेंबर २०२५ दरम्यान जकार्ता (इंडोनेशिया) येथे होणाऱ्या ज्युनिअर एशियन ज्युडो चॅम्पियनशिप २०२५ ज्युडो स्पर्धेत भाग घेणाऱ्या भारतीय ज्युनियर ज्युडो संघाच्या प्रशिक्षक पदी बेळगावच्या रोहिणी पाटील हिची निवड करण्यात आली आहे. ज्युडो फेडरेशन ऑफ इंडिया, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यावतीने रोहिणी पाटील हिची प्रशिक्षक पदी निवड झाली आहे.