- महापालिका आणि वाहतूक पोलिसांची संयुक्तपणे कारवाई
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेली अतिक्रमण हटविण्याची मोहीम बुधवारी रविवरपेठ येथे राबविण्यात आली. बेळगाव महापालिका आणि वाहतूक पोलिस विभागाने संयुक्तपणे राबविलेल्या या कारवाईत वाहतुकीला अडथळा आणणारे रस्त्यावरील विक्रेते आणि दुकानदारांचे अतिक्रमण हटवण्यात आले. अतिक्रमण केलेल्या वस्तू जप्त करण्यात आल्या. पार्किंग नसलेल्या जागांवर वाहने पार्क करणाऱ्या मालकांना दंड ठोठावण्यात आला. यावेळी एसीपी शिवाजी निकम यांनी अतिक्रमण स्वेच्छेने हटवले नाही तर जेसीबीचा वापर केला जाईल, असा इशारा दिला.