बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेलची (DYES) उयोन्मुख मल्ल स्वाती पाटील हिने राजस्थान येथील कोटा येथे झालेल्या २० वर्षाखालील ज्युनिअर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली. मुळची कडोली येथील बी.के. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या स्वाती हिने ५७ किलो वजनी गटात हे यश मिळवले असून या यशामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. एनआयएस कुस्ती प्रशिक्षक स्मिता पाटील आणि प्रशिक्षक मंजुनाथ मादार यांचे तिला मार्गदर्शन लाभत आहे.
December 7, 2025
बेळगाव / प्रतिनिधी बेळगावात उद्या (सोमवार) पासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली आहे. तब्बल दहा दिवसांचे हे अधिवेशन सुवर्ण विधानसौध येथे […]








