बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेलची (DYES) उयोन्मुख मल्ल स्वाती पाटील हिने राजस्थान येथील कोटा येथे झालेल्या २० वर्षाखालील ज्युनिअर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली. मुळची कडोली येथील बी.के. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या स्वाती हिने ५७ किलो वजनी गटात हे यश मिळवले असून या यशामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. एनआयएस कुस्ती प्रशिक्षक स्मिता पाटील आणि प्रशिक्षक मंजुनाथ मादार यांचे तिला मार्गदर्शन लाभत आहे.
January 24, 2026
‘कृष्ण भक्तीत न्हाहुन निघाली बेळगाव नगरी’ : उद्या समारोप बेळगाव : “हरे कृष्णा, हरे कृष्णा ,कृष्णा कृष्णा, हरे हरे” च्या जयघोषात निघालेल्या इस्कॉनच्या हरेकृष्ण रथयात्रेने आज […]








