• शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत आयोजन  
  • धारकऱ्यांकडून दौडसाठीची जय्यत तयारी

बेळगाव / प्रतिनिधी

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, २२ सप्टेंबरपासून घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत भव्य दुर्गामाता दौड बेळगाव शहरासह तालुक्यातील गावोगावी काढली जाणार आहे. या दौडीसाठी धारकऱ्यांकडून जोरदार तयारी सुरू असून शिवप्रेमींच्या स्वागताची धडपड सुरू झाली आहे.

देव, देश आणि धर्माच्या सन्मानासाठी दरवर्षी घेण्यात येणाऱ्या या दौडीमुळे तरुणाईत राष्ट्रभक्तीचा जागर होतो. संभाजीराव मिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे मंदिरांना भेटी देत भक्तिगीतांच्या गजरात शिवभक्त दौड काढतात. बेळगावात दररोज २५ ते ३० हजार शिवप्रेमी या दौडीत सहभागी होतात. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण उत्स्फूर्त सहभाग नोंदवतात.

या वर्षी अकरा दिवसांची दौड नियोजित असून चार दिवसांपूर्वीच मार्गरचनेचे नियोजन पूर्ण झाले आहे.परंपरेनुसार पहिल्या दिवशी छत्रे गुरुजी व सहकाऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसह ध्वजपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रभक्तीची जाज्वल्य परंपरा जोपासावी, असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे करण्यात आले आहे.

  • दौडमध्ये अयोग्य वर्तनाला थारा नको : 

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात बेळगाव शहरासह जिल्ह्यात दुर्गामाता दौड शिवप्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली काढली जाणार आहे. दरवर्षी दुर्गामाता दौडला मिळणारा प्रतिसाद वाढत असल्याने कुठेही शिस्तीला बाधा येईल असे वर्तन कोणत्याही धारकऱ्याने करू नये. दुर्गामाता दौडला. एक शिस्त असून भिडे गुरुजींच्या नियमावलीनुसारच दुर्गामाता दौड काढली जाणार आहे.
-किरण गावडे (कर्नाटक प्रांतप्रमुख, शिवप्रतिष्ठान)

  • दौडची नियमावली :
  • दुर्गामाता दौडला पहाटे ठीक ५.३० वाजता सुरुवात होणार असून त्यासाठी सर्वांनी वेळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. दौडमध्ये केवळ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतिकारक, भारत माता की जय, देवीदेवतांच्या नावांचा जयजयकार करावा.
  • राष्ट्रभक्ती धारा पुस्तकामधीलच गीते व श्लोक म्हणावेत.
  • पुरुषांनी भारतीय पांढरा वेश अथवा वारकरी पेहराव परिधान करावा तर महिला व मुलींनीही भारतीय पारंपरिक वेशात सहभाग घ्यावा.
  • पुरुषांनी व मुलांनी डोक्यावर वारकरी पांढरी टोपी किंवा भगवा फेटा परिधान करावा.
  • दौडच्या स्वागतासाठी ज्या कमानी उभारल्या जातात, त्या प्रशस्त व उंचीवर असाव्यात. त्या ठिकाणाहून ध्वजाला वाकून जावे लागणार नाही, तसेच ध्वजाचा अवमान होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
  • ठरलेल्या शिलेदाराव्यतिरिक्त इतर कोणीही ध्वजाच्या पुढे जाऊ नये.
  • दौड संपल्यानंतर मुलींनी फोटोसेशनसाठी किंवा बाहेर नाश्त्यासाठी इतर कोठेही न थांबता आपल्या घरी जावे.
  • इतर कोणत्याही घोषणा देणे, किंचाळणे, शिस्त बिघडवणे,आपापसात विनोद करत हसत जाणे, हे टाळावे.
  •  नियोजनानुसार गल्लीप्रमुख व विभाग प्रमुखांकडे ध्वज घेणाऱ्यांनी नावे नोंदवावीत. ऐनवेळी कोणाच्याही हातामध्ये ध्वज दिला जाणार नाही.
  • हिंदुस्थानच्यावतीने घोषित केलेले दुर्गामाता दौडीचे मार्ग :

सोमवार दि. 22 रोजी श्री शिवाजी उद्यान ते कपिलेश्वर मंदिरपर्यंत दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे. शिवाजी उद्यानपासून सुरुवात होऊन हुलबत्ते कॉलनी, महात्मा फुले रोड, एसपीएम रोड, संतसेना रोड, पाटीदार भवन रोड, शास्त्रीनगर, गुड्सशेड रोड, कपिलेश्वर कॉलनी, शास्त्रा नगर आठल्ये रोड, महाद्वार रोड क्रॉस नं. 4, माणिकबाग रोड, समर्थनगर, तानाजी गल्ली, महाद्वार रोड क्रॉस नं. 3 आणि क्रॉस नं. 2, संभाजी गल्ली, एसपीएम रोड, कपिलेश्वर मंदिर येथे सांगता होणार आहे.

मंगळवार दि. 23 रोजी चन्नम्मा सर्कलमधील गणेश मंदिर ते किल्ला येथील दुर्गामाता मंदिरापर्यंत दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे. गणेश मंदिरापासून सुरुवात होऊन काकतीवेस रोड, खडक गल्ली, कोर्ट, चव्हाट गल्ली, पी. बी. रोड, आरटीओ सर्कल, शिवाजीनगर, फोर्ट रोड, गांधीनगरमार्गे किल्ल्यातील दुर्गामाता मंदिर येथे सांगता होणार आहे.

बुधवार दि. 24 रोजी शिवतीर्थ ते धर्मवीर संभाजी चौक (जत्तीमठ) पर्यंत दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे. शिवतीर्थापासून प्रारंभ होऊन काँग्रेस रोड, ग्लोब टॉकीज रोड, इंडिपेंडेंट रोड, हायस्ट्रीट, चर्च स्ट्रीट, कल्याणी स्वीट मार्ट रोड, गवळी गल्ली, कोर्ट स्ट्रीट, वेस्ट स्ट्रीट, हाय स्ट्रीट, कोंडाप्पा स्ट्रीट, चर्च स्ट्रीट, मद्रास स्ट्रीट, कुंतीमाता मंदिर, फिश मार्केट, तेलगू कॉलनी, के. टी. पुजारी दुर्गामाता मंदिर, खानापूर रोड, धर्मवीर संभाजी चौक, जत्तीमठ दुर्गामाता मंदिरात सांगता होणार आहे.

गुरुवार दि. 25 रोजी धर्मवीर संभाजी चौक ते संयुक्त महाराष्ट्र चौकातील मारुती मंदिरपर्यंत दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे. किर्लोस्कर रोड येथून सुरुवात होऊन रामलिंगखिंड गल्ली, अशोक चौक, बसवाण गल्ली लक्ष्मी मंदिर, नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, बुरूड गल्ली, भातकांडे गल्ली, बुरूड गल्ली, मेणसी गल्ली, आझाद गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, कांदा मार्केट, मेणसी गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, कसाई गल्ली, कसाई गल्ली बोळ, कामत गल्ली, पी. बी. रोड, मार्केट पोलीस स्टेशन, शेट्टी गल्ली, भडकल गल्ली, कोर्ट कॉर्नर, सरदार्स ग्राऊंड रोड, सन्मान हॉटेल, कॉलेज रोड, यंदेखूट, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, बापट गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौकातील मारुती मंदिरात सांगता होणार आहे.

शुक्रवार दि. 26 रोजी खासबाग येथील बसवेश्वर सर्कलमधील दुर्गामाता मंदिर ते वडगाव येथील मंगाई मंदिरापर्यंत दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे. खासबाग येथील दुर्गामाता मंदिरपासून प्रारंभ होऊन भारतनगर पहिला क्रॉस, नाथ पै सर्कल, डब्बल रोड, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, मरगम्मा मंदिर रोड, भारतनगर हमाल गल्ली, भारतनगर 4 आणि 5 क्रॉस, रयत गल्ली, ढोरवाडा, सपार गल्ली, दत्त गल्ली, सोनार गल्ली, वडगाव मेन रोड, बाजार गल्ली, मारुती मंदिर, तेग्गीन गल्ली, जुने बेळगाव रोड, गणेशपेठ गल्ली, कुलकर्णी गल्ली, कोरवी गल्ली, संभाजी गल्ली, लक्ष्मी मंदिर लक्ष्मी गल्ली, बस्ती गल्ली, खन्नूकर गल्ली, चावडी गल्ली, रामदेव गल्ली, येळ्ळूर रोड, नाझर कॅम्प क्रॉस नं. 3, हरिजन वाडा, हरिमंदिर, विठ्ठल मंदिर, वझे गल्ली, धामणे रोड, विष्णू गल्ली, कारभार गल्ली, आनंदनगर, पाटील गल्ली, संभाजीनगर, पाटील गल्ली मंगाई मंदिर येथे सांगता होणार आहे.

शनिवार दि. 27 रोजी हरिद्रा गणेश मंदिर सदाशिवनगर ते शिवबसवनगर जोतिबा मंदिरापर्यंत दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे. हरिद्रा गणेश मंदिरपासून सुरुवात होऊन सदाशिवनगर मेन रोड, गणेश चौक, सदाशिवनगर 2 रा मेन 4 था क्रॉस, बेलदार छावणी, मरगाई मंदिर, सदाशिवनगर पहिला मेन पहिला क्रॉस, 2 रा क्रॉस, 3 रा क्रॉस, 4 था क्रॉस, 5 वा क्रॉस, नेहरूनगर 3 रा क्रॉस, 2 रा क्रॉस, 1 क्रॉस, कोल्हापूर सर्कल, जवान क्वॉर्टर्स, सुभाषनगर, मराठा मंडळ रोड, वड्डरवाडी, रामनगर, अशोकनगरमार्गे शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिरात सांगता होणार आहे.

रविवार दि. 28 रोजी शहापूर येथील अंबामाता मंदिर ते गोवावेस बसवेश्वर सर्कलपर्यंत दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे. अंबामाता मंदिरापासून सुरुवात होऊन नाथ पै सर्कल, लक्ष्मी रोड, कारवार गल्ली, लक्ष्मी रोड, गणेशपूर गल्ली, नवी गल्ली, डब्बल रोड, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, बनशंकरी नगर, मारुती गल्ली, बसवाण गल्ली, मरगम्मा गल्ली, वर्धाप्पा गल्ली, उप्पार गल्ली, संभाजी रोड, धारवाड रोड, जोशी मळा, संभाजी रोड, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, पवार गल्ली, खडेबाजार, बसवाण गल्ली, गाडेमार्ग, सराफ गल्ली, बिच्चू गल्ली, आचार्य गल्ली, विठ्ठलदेव मंदिर, नार्वेकर गल्ली, पी. बी. रोड, होसूर बसवाण गल्ली, बोळमल बोळ, खडेबाजार, म. फुले रोड, मीरापूर गल्ली, खडेबाजार, कचेरी गल्ली, हट्टीहोळ गल्ली, म. फुले रोड, रामलिंगवाडी, आनंदवाडी, वडगाव रोड, अळवण गल्ली, खडेबाजार, मेलगे गल्ली, जेड गल्ली, भोज गल्ली, दाणे गल्ली, खडेबाजार, दाणे गल्ली, कोरे गल्ली, बसवेश्वर सर्कल गोवावेस येथे सांगता होणार आहे.

सोमवार दि. 29 रोजी शिवाजी उद्यान ते दुर्गामाता मंदिर (जत्तीमठ) पर्यंत दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे. शिवाजी उद्यानपासून प्रारंभ होऊन एसपीएम रोड, कपिलेश्वर उड्डाण पूल, स्टेशन रोड, हेमूकलानी चौक, रामलिंगखिंड गल्ली, जत्तीमठ येथील दुर्गामाता मंदिरमार्गे शिवाजी उद्यान येथे सांगता होणार आहे.

मंगळवार दि. 30 रोजी टिळकवाडीतील शिवाजी कॉलनी ते अनगोळ येथील महालक्ष्मी मंदिरपर्यंत दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे. शिवाजी कॉलनी येथून सुरुवात होऊन एम. जी. रोड, महर्षि रोड, नेहरू रोड, फर्स्ट गेट, शुक्रवारपेठ, गुरुवारपेठ, देशमुख रोड, मंगळवारपेठ, शुक्रवारपेठ, गोवावेस स्वीमिंग पूल, सोमवार पेठ, देशमुख रोड, आरपीडी क्रॉस, खानापूर रोड, अनगोळ क्रॉस, अनगोळ रोड हरिमंदिर, चिदंबरनगर, पानसे हॉटेल रोड, हाजुगिरी, विद्यानगर, एस. व्ही. रोड, कुरबर गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रघुनाथ पेठ, भांदूर गल्ली, सुभाष गल्ली, हणमण्णवर गल्ली, मारुती गल्ली, लोहार गल्ली, नाथ पै नगर, बाबले गल्ली, रघुनाथ पेठ, कलमेश्वर गल्ली, लक्ष्मी गल्ली, महालक्ष्मी मंदिर अनगोळ येथे सांगता होणार आहे.

बुधवार दि. 1 ऑक्टोबर रोजी ताशिलदार गल्ली येथील सोमनाथ मंदिर ते शनि मंदिरपर्यंत दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे. सोमनाथ मंदिरपासून सुरुवात होऊन फुलबाग गल्ली, पाटील गल्ली, शनि मंदिर रोड, मठ गल्ली, कलमठ रोड, अनंतशयन गल्ली, टिळक चौक, रिझ टॉकीज रोड, कोनवाळ गल्ली, अनुपम हॉटेल रोड, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, शिवाजी रोड, मीनाक्षी हॉटेल क्रॉस, मुजावर गल्ली, कांगली गल्ली, स्टेशन रोड, पाटील गल्ली, फुलबाग गल्ली रोड, ताशिलदार गल्ली, पाटील मळा, भांदूर गल्ली, फुलबाग गल्ली (उषाताई गोगटे हायस्कूल), स्टेशन रोडमार्गे शनि मंदिरात सांगता होणार आहे.

गुरुवार दि. 2 ऑक्टो. रोजी मारुती गल्ली येथील मारुती मंदिर ते धर्मवीर संभाजी चौकपर्यंत दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे. मारुती मंदिरपासून सुरुवात होऊन नरगुंदकर भावे चौक, महालक्ष्मी मंदिर बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, बसवाण्णा मंदिर, अशोक चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, रिझ टॉकीज रोड, कोनवाळ गल्ली, अनसुरकर गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, केळकर बाग, समादेवी गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, नार्वेकर गल्ली, शनिवार खूट, काकतीवेस रोड, गणाचारी गल्ली, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, कंग्राळ गल्ली, काकतीवेस रोड, कंग्राळ गल्लीमागील बाजूचा बोळ, सरदार्स ग्राऊंड रोड, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोडमार्गे धर्मवीर संभाजी चौकात दुर्गामाता दौडची सांगता होणार आहे.