बेळगाव : यक्षित युवा फाउंडेशनच्या वतीने राव युवा ॲकॅडमीची ३७ वी तायक्वांडो कलर बेल्ट पदोन्नती चाचणी दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल येथे उत्साहात पार पडली. या चाचणीत विविध वयोगटातील तायक्वांडो खेळाडूंनी सहभाग घेत आपापल्या कौशल्याचे प्रदर्शन केले.
या चाचणीत अनेक खेळाडूंनी येलो, ग्रीन, ग्रीन वन, ब्लू, ब्लू वन, रेड आणि रेड वन बेल्टसाठी यशस्वीरीत्या मेहनत घेतली. तसेच काही खेळाडूंनी आपले विद्यमान बेल्ट रँक कायम ठेवण्यासाठी विशेष शारीरिक तंदुरुस्ती चाचणीत सहभाग नोंदवला.
ही पदोन्नती चाचणी भारतीय वायुसेनेचे आंतरराष्ट्रीय तायक्वांडो प्रशिक्षक तसेच यक्षित युवा फाउंडेशनचे अध्यक्ष तायक्वांडो मास्टर श्रीपाद आर. राव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली पार पडली.
यावेळी तायक्वांडो राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच असलेले यक्षित युवा फाउंडेशनचे ट्रस्टी स्वप्नील राजाराम पाटील आणि सरचिटणीस वैभव राजेश पाटील उपस्थित होते. आयोजकांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.








