• वडगाव श्रीराम कॉलनीतील सामूहिक कार्यक्रमात घेतला सहभाग

बेळगाव / प्रतिनिधी

वडगाव श्रीराम कॉलनी आदर्श नगर येथील रहिवासी संघटनेच्या वतीने आज रविवारी सकाळी सामूहिक रंगपंचमी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बेळगावचे महापौर मंगेश पवार उपस्थित होते. उपस्थित नागरिकांसह महापौर मंगेश पवार यांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. यावेळी मंगेश पवार यांनी आपले महापौर पदाची कारकीर्द यशस्वीरीत्या पार पाडली आहे. याबद्दल त्यांचा संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना महापौर मंगेश पवार यांनी प्रत्येकाने आपल्या घराप्रमाणेच शहराच्या स्वच्छतेसाठी जागरूकतेने कर्तव्य पार पडावे असा संदेश दिला.