बेळगाव / प्रतिनिधी

रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू ओढवला. मंगळवारी दुपारी समर्थनगर नजीक ही घटना घडली. अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव चंद्रकांत पांडुरंग भातकांडे (वय ७५, रा. खडक गल्ली, बेळगाव) असे आहे.
याबाबतची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. चंद्रकांत भातकांडे हे खडक गल्लीतील पंच होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि. २४ रोजी सकाळी ८ वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत होणार आहे.