- जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांची माहिती
बेळगाव / प्रतिनिधी
रायबाग तालुक्याच्या बुदीहाळ गावातील तरुण गायक मारुती लक्के याच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.

बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, मारुतीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे रायबाग पोलिसांनी तपास केला आणि आरोपी सिद्रामणी, आकाश आणि पुजारी यांना अटक करण्यात यश आले आहे.
मारुती पूर्वी ऊस टोळीतील मजूर होता आणि लोकगीतांमध्ये गुंतल्यानंतर त्याने टोळी सोडली. याच कारणावरून नियोजन करून हत्या करण्यात आल्याची माहिती डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. या प्रकरणी अधिक माहिती गोळा करण्यासाठी तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.