बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव ते पुणे असा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या वतीने पुणे शहरातून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरु होणार असून, यामुळे पुण्याची हाय स्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. विशेष म्हणजे, या चारही ट्रेन वेगवेगळ्या दिशांना धावणार असून प्रवाशांचा प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.
या वंदे भारत ट्रेनमुळे शेगाव वडोदरा, सिकंदराबाद आणि बेळगाव या चार महत्वाच्या ठिकाणांशी पुण्याची नवी नॉन-स्टॉप रेल्वे कनेक्टिव्हिटी तयार होणार आहे. थांबा मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच पुणे- नागपूर स्लीपर वंदे भारत ट्रेनही सुरु होणार आहे, ज्याचा फायदा व्यावसायिक, विद्यार्थी आणि पर्यटकांना होणार आहे.
पुणे – बेळगाव वंदे भारत : ही वंदे भारत एक्सप्रेस पश्चिम महाराष्ट्रातून प्रवास करेल.सातारा, सांगली आणि मिरज रेल्वे स्थानकावर या ट्रेनला या एक्सप्रेसमुळे प्रवासाचा वेळ दोन-तीन तासांनी कमी होऊ शकते. या वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकिटांची किंमत १,५०० ते २,००० रुपयांपर्यंत असण्याची अपेक्षा आहे. सध्या पुणे शहरातुन २ वंदे भारत ट्रेन धावतात. आता आणखी ४ वंदे भारत एक्सप्रेस पुण्यातून धावणार असल्याने पुणेकरांचा प्रवास सोप्पा होण्यास मदत होईल.