पुणे : मुलींना शिक्षण न मिळण्याच्या अवघड काळात संघर्ष करून ज्योतिराव- सावित्रीबाई फुले दांपत्यांनी पुण्यातील ज्या भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली त्या भिडेवाड्याची दयनीय अवस्था बघून संविधान दुत विजय वडवेराव यांना प्रचंड वेदना झाल्या.त्यांना भिडेवाडा वाचवण्याच्या ध्येयाने पछाडले.आणि त्यांच्या प्रयत्नातून 2012साली जनजागृतीपर पहिले छोटे कविसंमेलन भरले.तेव्हापासून त्यांनी मित्र, शिक्षक यांना संघटीत करून फुले दांपत्याच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार यासाठी चळवळ उभी केली. त्यांच्या या कार्यात शेकडो फुलेप्रेमी सहभागी झाले.फुले यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार या उद्देशाने गतवर्षी 2024 साली त्यांनी पहिले आंतरराष्ट्रीय फुले महोत्सव भरवले.

यावर्षीही जाग्रृती उपक्रम राबविताना शेकडो कवींना खुले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी 2 ते 5 जानेवारी असे चार दिवसीय दुसर्‍या आंतरराष्ट्रीय फुले महोत्सवाचे आयोजन विजय वडवेराव यांनी केले. या महोत्सवात बेळगावच्या पाच कवयित्री सहभागी होत्या.सौ.पुजा सुतार, सौ.अस्मिता आळतेकर, सौ. रोशनी हुंद्रे ,प्रा.सौ.शुभदा प्रभू खानोलकर, प्रा.डाॅ.सौ.मनिषा नाडगौडा या पाच जणींना सन्मान पत्र, सन्मानचिन्ह, संविधान ग्रंथ,साडी,संविधान मय शालेय पॅड दे ऊन सन्मानित करण्यात आले.

देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत 2 जानेवारी ते 5 जानेवारी असे चार दिवसीय दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे आयोजन पुणे येथे एस एम जोशी फॉउंडेशन सभागृहात करण्यात आले. फुले फेस्टिव्हलच्या माध्यमातून देशभर क्रांतीसूर्य महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीआई फुले यांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाचा आणि भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार करुन फुलेप्रेमी व संविधान दूत घडविणे हाच फुले फेस्टिव्हलचा मुख्य उद्देश असल्याचे फेस्टिवव्हलचे मुख्य आयोजक भिडेवाडाकार फुलेप्रेमी संविधान दूत शिक्षक कवी विजय वडवेराव यांनी सांगितले. चार दिवसांत दररोज क्रांतिसूर्य महात्मा फुले, सावित्रीआई फुले, फातिमाबी शेख, वस्ताद लहुजी साळवे, संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान या विषयांवर दिवसभर काव्य महोत्सव, एकांकिका, एकपात्री प्रयोग, नाट्यछटा, एकांकिका, सांगितीक पोवाडे, लाठी काठी, दांडपट्टा, तलवारबाजी प्रात्याक्षिक इत्यादी भरगच्चआणि दर्जेदार उपक्रम घेण्यात आले. सावित्रीआई फुले जयंती दिनी सावित्रीआईना काव्यरुपी मानवंदना देण्यासाठी २०० फुलेप्रेमी कवयित्रिंना सावित्रीआईची वेशभूषा म्हणून २०० हिरव्या लुगडयांचे मोफत वाटप करण्यात आले. चारही दिवस सर्वांना चहा नाष्टा जेवण या सुविधा मोफत पुरविण्यात आल्या. सभागृहात उपस्थित शेकडो फुलेप्रेमी या फेस्टिव्हलचे अध्यक्ष होते ही ऐतिहासिक घटना होती.संविधानाचा प्रचार प्रसार व जनजागृती करण्यासाठी. सहभागी कवी कवयित्रिंना व फुलेप्रेमी रसिकांना १००० संविधान ग्रंथांचे व १००० संविधानमय शालेयपॅडचे मोफत वाटप करण्यात आले.देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १४फुलेप्रेमी कवी कवयित्री कार्यकत्यांना आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्काराने आणि संविधान जागर अभियानांतर्गत संविधानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी माझे संविधान माझी जबाबदारी या उपक्रमात सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ८ संविधान दूत कवी कवयित्री कार्यकर्त्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संविधान दूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुण्यातल्या या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलसाठी महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, राजस्थान इत्यादी राज्यातून व अबुधाबी दुबई येथूनही कवी कवयित्री, कलाकार आणि रसिक असे मिळून जवळपास २००० पेक्षा जास्त फुलेप्रेमींनी हजेरी लावली.

  • आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्कार : 

1) मा.डॉ.मंजू राजेजाधव ( सिंदखेडराजा, बुलढाणा)
2) मा.उज्ज्वला फुलसुंदर ( पुणे)
3) मा.दत्तात्रय भोसले ( परभणी)
4) मा.मधुकर नाईक (पुणे)
5) मा.मनिषा शिंदे ( पुणे)
6) मा.पुंडलिक काटकर ( गडचिरोली)
7) मा.सिद्धार्थ पानपाटील (धुळे)
8) मा.अनिल नाटेकर ( आळंदी)
9) मा.चरण जाधव (छ. संभाजीनगर)
10) मा.संदेश कर्डक ( मुंबई)
11) मा.शारदा गणोरकर ( अमरावती )
12)मा.गायत्री रामटेके ( बल्लारपूर, चंद्रपूर )
13) मा.शोभा धामस्कर ( मडगाव, गोवा )
14) मा.वैशाली लांडगे ( पुणे )

  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संविधान दूत पुरस्कार

१) मा.विद्या मलवडकर (सातारा)
२) मा.दुर्गा राऊत (माजलगाव, बीड)
3) मा. प्रतिभा किर्तीकर्वे ( पुणे)
4) मा. पूनम पाटील ( जळगाव)
5) मा.नंदा मघाडे ( जळगाव)
6) मा. क्रांती वेंदे ( धुळे)
7) मा. बबन चव्हाण ( पुणे)
8) मा. सरिता कलढोणे (जुन्नर, पुणे)