येळ्ळूर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येळ्ळूर सरकारी मॉडेल शाळेतील सन २०२३-२४ साली सातवीच्या परिक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना कै. गंगुबाई लुमाण्णा यळगुकर यांच्या स्मरणार्थ प्रताप गल्ली येळ्ळूर येथील शाळेचे एसडीएमसी सदस्य श्री.मारुती कृष्णा यळगुकर यांनी सन्मानित केले.

यामध्ये कु.वैष्णवी लक्ष्मण कुंडेकर (प्रथम), कु. प्रज्योती अनिल पाटील (द्वितीय), कु. जयदीप शिवाजी खेमणाकर (तृतीय) या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी सैनिक श्री. शिवाजी जोतिबा नांदुरकर, माजी सैनिक श्री. शंकर टक्केकर,शाळेचे एसडीएमसी उपाध्यक्ष श्री. जोतिबा उडकेकर, सदस्य श्री. चांगदेव मुरकुटे, श्री. मुर्तीकुमार माने, श्री. दिनेश लोहार, श्री. शशिकांत पाटील, श्री. विजय धामणेकर, श्री. जोतिबा पाटील, सदस्या सौ.अलका कुंडेकर, सौ. प्रियंका सांबरेकर, सौ.राजश्री सुतार, सौ. दिव्या कुंडेकर, सौ.माधुरी कुगजी, सौ. रेश्मा काकतकर, श्रीमती. शुभांगी मुतगेकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र चलवादी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.