- खुनाचा संशय
अथणी / वार्ताहर
अल्पवयीन मुलीच्या प्रेमात पडून गावोगावी फिरणाऱ्या एका तरुणाने नंतर आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यातील बिलगाव येथील गणेश राजू शिवपूजे (वय २२) असे मृताचे नाव आहे. दि. १९ जून रोजी खिळेगावनजीक महाराष्ट्रातील कवटे महाकाल तालुक्यातील जंगलात त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला.
गणेश एका अल्पवयीन मुलीवर प्रेम करत होता आणि तिला घेऊन पळून गेला होता. यावर मुलीच्या पालकांनी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. यानंतर त्याने संबंधित मुलीला तिच्या घरी सोडले होते. मात्र या सगळ्या प्रकरणानंतर तो कवटे महाकाल तालुक्यातील जंगलात लटकलेल्या अवस्थेत आढळला. सदर घटनेला २० दिवस उलटूनही त्याने आत्महत्या केली की त्याचा खून झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.